Sunday, July 22, 2007

नाशिक मधे "कृषी 2007'

नाशिक मधे "कृषी 2007'
कृषी क्षेत्रातील मान्यवर कंपन्यांचा सहभाग असणारे तसेच "बायर सेलर मीट' सारखा नावीन्य पूर्ण उपक्रम राबविणारे "कृषी 2007' हे प्रदर्शन येत्या 28 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान नाशिक मधे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनासंदर्भात नुकतीच एक बैठक येथे पार पडली त्यावेळी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, पणन मंत्री हर्षवर्धन पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. दर दोन वर्षाने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शन साठी यंदा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रिकल्चर सहआयोजक म्हणून काम पहात आहे असे चेंबर्स चे उपाध्यक्ष दिग्विजय कपाडिया यांनी सांगितले. शेती क्षेत्रातील व्यापक संधी व नवी आव्हानांचा मुकाबला करण्यासाठीच्या आवश्‍यक तंत्रज्ञानाचा सहभाग असलेले "कृषी 2007' यशस्वी ठरेल असा विश्‍वास आयोजक संजय न्याहारकर यांनी व्यक्त केला आहे.

No comments: